Home Cities पारोळा आंबापिंप्री येथील कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

आंबापिंप्री येथील कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

0
118

shetkari aatmahatya parola पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील आंबापिंप्री येथील शेतकर्‍याने कर्जबाजारीपणास कंटाळुन विष प्राशन केल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, आंबापिंप्री येथील प्रविण शालिक माळी (वय ३५) यांच्यावर विविध कार्यकारी सोसायटी व हातउसनवारीचे कर्ज होते. तसेच सततच्या नापिकीमुळे ते हताश झाले होते. या विवंचनेत त्यांनी दिनांक २६ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० वाजेच्या दरम्यान स्वत:च्या गोठ्यात कपाशी फवारणीचे विषारी औषध सेवन केले. यामुळे त्यांना उपचारासाठी कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डाँक्टरांनी तपासुन मयत घोषीत केले.
याबाबत पारोऴा पोलिसात शालिक माळी यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली तपास काशिनाथ पाटील करित आहेत. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, बहीण, पत्नी व मुलगी आहे.


Protected Content

Play sound