दारूच्या नशेत तरुणाचे विष प्राशन

suside

जळगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील एका ३० वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत पिक फवारणीचे विषारी औषध प्राशन करत शेतात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज दुपारी घडलाय. घरी आल्यावर अत्यवस्थ वाटू लागल्याने नातेवाईकांनी त्याला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

 

या संदर्भात अधिक असे की, चिंतामण शंकर गायकवाड (वय 30 रा. नगरदेवळा ता.पाचोरा) या तरुण शेतकऱ्याने दारूच्या नशेत नगरदेवळा शिवारातील आपल्या शेतात दुपारी १२ वाजेच्या सुमारास विषारी औषध सेवन केले. घरी आल्यावर त्याला अत्यवस्थ वाटू लागले. त्यानंतर आपण विष घेतल्याचे त्याने पत्नीला सांगितल्यानंतर पत्नीने तातडीने खासगी वाहनाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. आत्महत्या प्रयत्न करण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलिसात कुठलीही नोंद झालेले नाही.

Protected Content