दिल्ली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांनी संयुक्तपणे निरोप समारंभ आयोजित करत मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज आज निरोप दिला.
याप्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती होती. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्मृतिचिन्ह प्रदान केले. यानंतर “मला राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी देशातील नागरिकांचा सदैव ऋणी राहीन.” असे निरोप देताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले,
पुढे बोलतांना “पाच वर्षांपूर्वी मी येथील सेंट्रल हॉलमध्ये भारताच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. सर्व खासदारांसाठी माझ्या हृदयात विशेष स्थान आहे असें सांगत कोरोनाविरुद्ध विक्रमी लसीकरण केल्याबद्दल त्यांनी सरकारचे कौतुक करत त्यांनी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले.