Home राष्ट्रीय मनोहर पर्रीकर अनंतात विलीन

मनोहर पर्रीकर अनंतात विलीन

0
58

पणजी वृत्तसंस्था । गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरू असतांना काल सायंकाळी त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने गोव्यावर शोककळा पसरली असून देशभरात त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. एक अत्यंत बुध्दीमान, कर्मयोगी आणि साधेपणाने वागणार्‍या नेत्याला सर्वपक्षाच्या नेत्यांनी श्रध्दांजली अर्पण केली. आज सकाळी ११ वाजता पणजी येथील कला अकादमीमध्ये त्यांचे पार्थिव जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हजारो लोकांनी साश्रुनयनांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना त्यांचे अंत्यदर्शन घेतांना अश्रू आवरता आले नाही. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिरामार येथील समुद्रकिनाऱ्यावरील मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound