जळगाव प्रतिनिधी । महापालिकेतील नगररचनाकार अनंत धामणे आज सेवानिवृत्त होत असून या प्रित्यर्थ त्यांना शहरातील आर्कीटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशन असोसिएशनतर्फे सत्कार करून निरोप देण्यात आला.
अनंत धामणे हे नगररचना विभागात तब्बल ३२ वर्षे कार्यरत होते. ते सध्या जळगाव महापालिकेत नगररचनाकार म्हणून कार्यरत होते. डिसेंबर अखेरीस ते सेवानिवृत्त होत आहेत. यानिमित्त आज येथील आर्कीटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशन संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करून त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
या निमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमाला आर्कीटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर चोपडे, सचिव अभिजीत महाजन, बिल्डर्स असोसिएशनचे चंद्रकांत पाटील, प्रमोद माळी, किशोर वाणी व विजय पाटील यांच्यासह गनी मेमन, रोहन बाहेती, चंद्रशेखर कापडे, विनय पारख, ललीत राणे, भागवत पाटील, निरज मंत्री, अरवींद चौधरी, श्रीकांत वाणी, ज्ञानेश्वर पाटील, भरत लोहार, रवींद्र महाले, चंद्रकांत पाटील, विजय भंगाळे, पंकज देवरे, अनंत चौधरी, मंगेश चौधरी, हितेश पारख, पंकज भैय्या, सुदीप पवार, प्रमोद माळी, तुषार वाणी, विशाल पाटील, अनिल पाटील विजय मराठे, विजय पाटील आदींची उपस्थिती होती. उपस्थितांनी धामणे यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.