यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव-डोणगाव रस्त्यावरील किनगाव इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ भावुक वातावरणात पार पडला. नुकत्याच दहावीच्या परीक्षा संपल्याने शाळेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
विशेष म्हणजे, दहावीचे विद्यार्थी गेल्या दहा वर्षांपासून (इयत्ता पहिलीपासून) निवासी शिक्षण घेत होते. शाळेचे संस्थापक विजयकुमार देवचंद पाटील, त्यांचे दिवंगत चिरंजीव केतनदादा पाटील आणि सचिव मनीष विजयकुमार पाटील यांनी या विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले. या विद्यार्थ्यांनी पहिलीपासून दहावीपर्यंतचा प्रवास सुखकर झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दहा वर्षांच्या आठवणी सांगितल्या. लहानपणी कपडे घालता येत नव्हते, तेव्हापासून शाळेने आणि शिक्षकांनी त्यांना घडवल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.
शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना शिकवताना आलेल्या अनुभवांची वास्तविकता सांगितली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाळेचे सचिव मनीष पाटील यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात कोणत्याही मदतीची गरज लागल्यास संपर्क करण्याचे आश्वासन दिले. मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
या कार्यक्रमाला चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनीष विजयकुमार पाटील, केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ. पूनम पाटील, मुख्याध्यापक अशोक पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव, राजश्री अहिरराव, मिलिंद भालेराव, गोपाल चित्ते, सोनाली कासार, योगिता सावळे, हर्षल मोरे, प्रतिभा पाटील, मयुरी बारी, सचिन सोनवणे, ज्ञानेश्वर धनगर, रोहित बाविस्कर, वैशाली मराठे, देवयानी साळुंखे, रामकृष्ण पाटील, भावना चोपडे, प्रतिभा धनगर, पवनकुमार महाजन, ऐश्वर्या सोनार, योगिता बिहारी, तिलोत्तमा महाजन, माधुरी फालक, नूतन देशमुख, सोनाली वाणी, प्रतिभा पाटील, बाळासाहेब पाटील, निलेश महाजन, गोकुळ आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.