वरणगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षकांसह अधिपरिचारिकांचा निरोप समारंभ

वरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे यांच्यासह अधिपरिचारिका अर्चना वासनिक यांची ही बदलीनिमित्त निरोप समारंभाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

गेल्या तीन वर्षापासून अधिपरिचारिका अर्चना वासनिक आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर क्षितीजा हेंडवे या वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नागरिकांची सेवा करत होत्या. गेल्या दोन वर्षापासून कोरोना कालावधीत या दोन्ही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांची खूप मोठी सेवा केली आहे. त्यांचा आज निरोप समारंभ वरणगावच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये घेण्यात आला. डॉक्टर आणि आधी परिचारकांच्या निरोप समारंभा वेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांचे डोळे पाणावले. डॉक्टर आणि अधिपरिचारिका यांनी स्टाफ व नागरिकांच्या आरोग्याची घेतलेली काळजीमुळे उपस्थितांचे यावेळी डोळे पाणावले. यावेळी वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील सर्व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content