जळगाव प्रतिनिधी । शस्त्राने प्राणघातक हल्लाप्रकरणात भुसावळ शहर पोलीसात दहा वर्षांपुर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. पुढील कारवाईसाठी भुसावळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारदार शस्त्राने एकावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपी भगवान निळकंठ नन्नवरे (वय-50) रा. भुसावळ यांच्या विरोधात भुसावळ शहर पोलीसात भाग 5/2010 भादवि 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता. संशयित आरोपी भुसावळ पोलीसात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पोहेकॉ रविंद्र पाटील, विनोद पाटील, दिपक पाटील, सुधाकर अंबरे, अनिल देशमुख, मुरलीधर बारी याचे पथक तयार करून आरोपी भगवान नन्नवरे यांला भुसावळ रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीतास भुसावळ शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.