मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना विराम देत ख्यातनाम उद्योजक तथा समाजसेवक श्रीराम दयाराम पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. रावेर येथील उद्योजक श्रीराम दयाराम पाटील यांनी गतवर्षाच्या उत्तरार्धात झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आपण आगामी काळात राजकारणात सक्रीय होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. शक्य झाल्यास लोकसभा अन्यथा रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आपण कोणत्याही पक्षात जाणार नसून तूर्तास अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
यानंतर ते अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. २ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अमळनेर येथे आले असतांना त्याच दिवशी रावेरात मोठा कार्यक्रम घेऊन श्रीराम पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील असे ठरल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र हा कार्यक्रमच रद्द झाला.
यानंतर श्रीराम पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आले होते. तर दोन दिवसांपूर्वीच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकारांशी बोलतांना लवकरच श्रीराम दयाराम पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितल्याने याबाबत संभ्रम दूर झाला होता. या अनुषंगाने काल सायंकाळीच श्रीराम पाटील हे आपल्या समर्थकांसह मुंबई येथे रवाना झाले होते.
दरम्यान, आज दुपारी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात श्रीराम पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश सोहळा पार पडला. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीराम पाटील यांचा मुख्य इंटरेस्ट हा विधानसभेत असून ते रावेर-यावल मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागू शकतात. यामुळे अर्थातच आगामी काळातील राजकीय स्थिती ही अतिशय मनोरंजक आणि चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.
श्रीराम दयाराम पाटील,चेअरमन श्रीराम उद्योग समूह, मा. नगराध्यक्ष शितल रमेश पाटील, अब्दुल मूत्तलीफ मा. उप. नगराध्यक्ष नगरपरिषद रावेर, सचिन अशोक मोरे उपसरपंच बोरावल ता. यावल,सोपान पाटील संचालक रावेर पीपल बँक,केतन राणे संचालक विकासो विवरे, कुलदीप पाटील संचालक विकासो बोरावल,राजेंद्र चौधरी,स्वप्नील पाटील सेक्रेटरी मायर्को व्हिजन अकॅडमी रावेर, प्रशांत पाटील, विनोद पाटील निलेश पाटील यावल,रामचंद्र पाटील प्रगतीशील शेतकरी पातोंडी,गोविंद पाटील प्रगतीशील शेतकरी केऱ्हाळे,लक्ष्मण चौधरी अहिरवाडी, सुरज कोलते जळगाव, नावा खाटीक रावेर, गोपाल दर्जी अध्यक्ष दर्जी फौंडेशन जळगाव,प्रल्हाद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव, महेश चौधरी भाजपा ता. अध्यक्ष रावेर पद्माकर महाजन, प्रवीण पाचपोहे, सुनील पाटील मा. भाजपा ता. अध्यक्ष रावेर, राहुल पाटील, शेख जाहीर विवरा, बंडू पाटील रावेर, दिपक नगरे,जयवंत पाटील रावेर, प्रशांत चौधरी, नितिन बिरपण