Home क्राईम पैशांसाठी कुटुंबावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला !

पैशांसाठी कुटुंबावर लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैशांच्या वादातून कुटुंबावर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता पंढरपूर नगर भागात घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या आई-वडिलांनाही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी ९ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर चंद्रकांत गुरख (वय २१, रा. पंढरपूर नगर) याने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मयूर हा आपल्या परिवारासह गोदावरी कॉलेजच्या मागे वास्तव्यास आहे. रात्री ११:३० वाजेच्या सुमारास त्याचा नातेवाईक असलेला आरोपी शंतनू चंद्रकांत गुरख (रा. हनुमान नगर) हा त्यांच्या घरी आला. शंतनूने मयूरच्या आईकडे पैशांची मागणी केली. मात्र, “आमच्याकडे सध्या पैसे नाहीत” असे मयूरच्या आईने सांगताच शंतनूचा राग अनावर झाला.

त्याने आरडाओरडा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा मयूर आणि त्याचे वडील शंतनूला समजावण्यासाठी गेले, तेव्हा आरोपीने जवळ असलेला लोखंडी पाईप काढून मयूरच्या डोक्यावर जोराने प्रहार केला. इतक्यावरच न थांबता त्याने मयूरच्या आई-वडिलांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि “तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देऊन पळ काढला. या घटनेनंतर जखमी मयूरवर उपचार करण्यात आले असून, त्याने दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound