यावल प्रतिनिधी । आरोपीचे न्यायालयातून जामीन मिळवण्यासाठी खोटे दस्तावेज दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी यावल न्यायालयाच्या आदेशान्वये यावल ठाण्यात सहाय्यक अधीक्षक दिवाणी व फौजदारी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या तक्रारीनुसार जळगाव येथील एका महिला वकीलच्या विरुद्ध यावल पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने वकील वर्गात एकच खळबळ उडाली आहे.
यावल पोलीस स्टेशन हद्दीत डांभुर्णी गावी झालेल्या भानगडीत गुन्हा क्रमांक 62 / 2020 भादवी 307, 353, 332, 323, 337, 341, 186, 188, 427, 143, 147, 149 कलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 सह क्रिमिनल अँमेंडमेंट ॲक्ट 3 व 7 सह मु. पो. कायदा कलम 135 प्रमाणे गुन्ह्यातील संशयित आरोपी घनश्याम जानकीराम कोळी, कमलाकर कडू कोळी, विजय जानकीराम कोळी यांना न्यायालयातून जामीन मिळणे करिता जिल्हा व सत्र न्यायालय भुसावळ येथील बेल अर्ज नंबर 318/ 20 मधील आदेश 22 जून 20 अन्वये झालेले आहे. असे महाशय न्यायालय यावल यांचे समक्ष वरील आदेश बरोबर आहे असे आरोपी महिला वकील राणी अग्रवाल यांनी शपथपत्रात नमूद करून शपथेवर लिहून दिलेले आहे. त्याचे शपथपत्रांवरुन न्यायालयात यांनी यावल पोस्ट भाग-5, गु.र.नं. 62/20 मधील आरोपी घनश्याम कोळी कमलाकर कोळी विजय कोळी राहणार डांभुर्णीचे जामीन आदेश झाले व आरोपीचे जामीन करून घेतले.
परंतु प्रत्यक्षात यावल न्यायालयांनी जिल्हा व सत्र न्यायालय भुसावळ यांचेकडील यावल कडील गुन्हा क्रमांक 62 / 20 मधील नमूद बेल अर्ज क्रमांक 318 /20 दिनांक 22 जून 20 बाबत न्यायालयाच्या संकेतस्थळावर पडताळणी केली असता बेल अर्ज 318 /20 हा यावल पोलीस स्टेशन गु.र.नं. 62/20 मधील बेल अर्ज नसून यावल पोस्टे कडील गुन्हा 94 /20 या गुन्ह्यातील आरोपी नामे विकास उर्फ राजू भागवत सपकाळे यांचा जामीन मंजूर झाल्याचे आदेश असल्याबाबत निष्पन्न झाले. यातील आरोपी अॅड . राणी कैलास अग्रवाल रा . जळगाव हिने यावल न्यायालयांची समक्ष माननीय जिल्हा व सत्र न्यायालय भुसावळ यांचेकडील जामीन मंजूर झाल्याचे आदेशाची खोटे दस्तावेज दाखल करून व नमूद म. च्या सत्य प्रतिज्ञेवर लिहून देऊन आरोपीची जामीन करून न्यायालयाची फसवणूक केली म्हणून गुन्हा यावल पोलीस निरीक्षक यांचे आदेशाने गुन्हा रजिस्टर दाखल करून खबरी रिपोर्ट मेहरबान अधिकार असणारे मॅजिस्ट्रेट यांचेकडे खबरी रिपोर्ट पाठवण्यात आला असून वरिष्ठांना सदर गुन्ह्यांची माहिती ईमेलद्वारे पाठविण्यात आली.
याबाबत यावल पोलीस स्टेशन मध्ये हे यावल दिवाणी व फौजदारी न्यायालयातील “क” स्तर सहाय्यक अधीक्षक सुनील भास्कर शुक्ल यांच्या फिर्यादीवरून आरोपी अॅड. राणी कैलास अग्रवाल रा . जळगाव यांच्याविरुद्ध यावल पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांचे आदेशान्वये यावल पोलीस स्टेशनला भाग-5 गुरव 145/20 भादवि कलम 420, 467, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार जितेंद्र खैरनार हे करीत आहेत . सदरचा गुन्हा दाखल झाल्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कायद्याचे ज्ञान असणाऱ्या वकील मंडळींच्या गोटात एकच खळबळ उडाली असून वकील वर्गात एकच चर्चेचा विषय बनला आहे.