अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप

bd983ee5 0bdd 49c5 8e15 36f51e62fc6d

यावल (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलन न्यासचे जळगाव जिल्हा संघटक व पत्रकार सुरेश पाटील व पत्रकार बांधवांनी आज (दि.१५) वृद्धआश्रमात, अनाथालयात आणि मनोरुग्णांना फळांचे वाटप केले.

 

वेले (ता. चोपडा) येथील अमर संस्थेव्दारे संचलीत मनोरुग्ण व अनाथआश्रम तथा वृद्ध आश्रमातील रुग्णांना महाराष्ट्राचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसा निमित्त फळे व बिस्किट वाटप करण्यात आले. याप्रसंगी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जिल्हा संघटक व पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांच्या व यावलचे पत्रकार राजु कवडीवाले, पत्रकार डी.बी. पाटील, पत्रकार अरूण पाटील, यांच्यासह पत्रकार अय्युब पटेल यांच्या हस्ते मनोरुग्णांना तसेच अनाथ मुले व वृद्धा आश्रमातील वृद्धांना फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.

अमर संस्थेव्दारे बेवारस मनोरूग्णांचे उपचार व पुर्नवसन करण्याचे कौतुकास्पद सामाजिक कार्य केले जात आहे. या सामाजाला नवी दिशा देणाऱ्या संस्थेचे कार्य हे अतिशय वाखाणण्यासारखे आहे. संस्थेने लोक सहभागाच्या जोरावर मानव सेवातीर्थ सुरू केले असुन यात समाजातुन दुर्लक्षीत, बेघर, बेसहारा, मनोरूग्ण (वेडे) बांधवांना स्वत:चे घर पुन्हा मिळावे व त्यांची ओळख पुन्हा माणुस म्हणुन व्हावी, याकरीता संस्थेने हे विधायक उपक्रम हाती घेतले आहेत.
अमर संस्थेचे हे समाजाला दिशा देणाऱ्या अविस्मरणीय कार्याला समाजातील सुजाण, दानशुर, कर्तव्यदक्ष अशा माणसांच्या मदतीची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे भावनीक आवाहन संस्थाध्यक्ष चंद्रकांत जी. पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

Protected Content