फैजपूर, ता. यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातून मुनीश्री विशेष सागरजी महाराज यांच्या सानिध्यात गुरुवारी सकाळी ७ वा. मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी ध्वजारोहण विकास जैन आणि पंचकल्याणक महोत्सवाचे उदघाट्न महेंद्रकुमार बडजात्या यांचे हस्ते करण्यात आले.
चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरातून मुनीश्री विशेष सागरजी महाराज यांच्या सानिध्यात गुरुवारी सकाळी ७ वा मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी ध्वजारोहण विकास जैन आणि पंचकल्याणक महोत्सवाचे उदघाट्न महेंद्रकुमार बडजात्या यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी भाविकांनी रांगोळ्या काढलेल्या होत्या. मिरवणूकमध्ये ठिकठिकाणी पाद्यपूजन करण्यात आले. मिरवणूक लक्कडपेठ, मोठा मारुती, बोरोले, पेहेड वाडा, खुशालभाऊ रॊड, सुभाष चौक, बस स्टॅन्डमार्गे सुमंगल लॉन्सवर पोहचली. मिरवणूकित हत्ती हे आकर्षण ठरले.
वेदी शुद्धी, जनाभिषेक होऊन मुनीश्रीयांनी भगवंतांचे पंचकल्याण गर्भ कल्याणकवर उपस्थिताना आपल्या प्रवचनातून माहिती दिली. पंच कल्याणकाची पहिली पायरी आहे. गर्भ कल्याणक गर्भ एक असे सुरक्षित स्थान आहे. जेथे आत्म्याला धक्का लागत नाही. आईचे संस्कार आचरण जसे असते तसेच संस्कार गर्भस्थ शिशुवर पडतात. साधारण गर्भचा अर्थ आहे. मरणानंतर आणि जन्मापूर्वी काही दिवस विश्राम येथे गर्भासोबत कल्याणक शब्द जोडले आहे. ज्या कारणामुळे गर्भात विशेषता येऊन जाते.
गर्भ कल्याणक त्यांचाच साजरा केला जातो. जो स्वतः कल्याणाच्या पथावर चालून अन्य जीवांचे कल्याण व्हावे या भावनेने जोडलेला असतो. जो आत्मा अतितमध्ये साधना करतो. परोपकार करतो, केवली किंवा शुद्ध केवलीच्या चरणात सोलह करण भावतो. असा आत्मा जेव्हा कोणताही पुण्यशाली आईच्या उदरात येतो.” असे मुनीश्री विशेषसागर महाराज यांनी उपस्थित भाविकांना सांगितले. कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा. असे सकल जैन समाज फैजपूर यांनी आवाहन केले आहे.
या कार्यक्रमासाठी फैजपूर, सावदा, रावेर, भुसावळ, जळगाव, जसपूर, छत्तीसगड, रायपूर, जबलपूर, मुंबई, वाशीम, विदिशा, मोताळा येथील समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पालिकेने गावात स्वच्छता केली मिरवणूक शांततेत पार पडली सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांचे मार्गदर्शन खाली हेमंत सांगळे, बाळू भोई, योगेश दुसाने, उमेश चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.