Home क्राईम दुचाकींची चोरी करणारा फैजपूर पोलीसांच्या ताब्यात

दुचाकींची चोरी करणारा फैजपूर पोलीसांच्या ताब्यात

0
21

फैजपूर प्रतिनिधी । भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरीच्या दाखल गुन्ह्यातील आरोपीला फैजपूर पोलिसांच्या पथकाने दि.12 रोजी अकलुद नाका येथून अटक केली आहे.

आरोपी शुभम पाटील, रा. अकलुद असे असून त्याच्या जवळून चोरी केलेले वाहन ही ताब्यात घेतले आहे. सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य फौजदार हेमंत सांगळे, पो. नाईक चाटे, हेमंत वंजारी, उमेश सानप, विकास सोनवणे, या पथकाने कारवाई करीत भुसावळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound