फैजपूर प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने आपल्या दिलेल्या वचन नाम्यानुसार जम्मू आणि काश्मीरमधून धारा 370 कलम हटविल्याने फैजपूर शहरात आमदार हरीभाऊ जावळे यांच्याकडून स्वागत करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पेढे वाटून आणि ढोल ताश्यांच्या गजरात फटाके फोडून शहरातील सुभाष चौक येथे दुपारी महाराष्ट्र शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आ हरीभाऊ जावळे यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष महानंदा होले, भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र कोल्हे, हिरालाल चौधरी, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, सरचिटणीस विलास चौधरी, माजी नगराध्यक्ष बी.के. चौधरी, भाजप गटनेते मिलिंद वाघुळदे, दिलीप दस्तुरे, नितिन राणे, नगरसेवक रघुनाथ कुंभार, पी. के. चौधरी, पिंटू राणे, नितिन नेमाडे, अनंत नेहेते, यशवंत चौधरी, शहराध्यक्ष संजय रल, मोहिनी पाटील, जयश्री चौधरी, संगीता चौधरी, दीपाली चौधरी, यासह सर्व मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी नगरसेवक उपस्थित होते.