फैजपूर येथे विद्यार्थ्यांच्या अंगावर बस नेण्याचा प्रयत्न (व्हिडीओ)

फैजपूर, प्रतिनिधी । फैजपूर शहरात अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या असल्याने बसस्थानकात विद्यार्थ्यांची गर्दी होत असते. यातच गेल्या आठ दिवसापासून चिनावल बस वेळेवर येत नसल्याने आज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बऱ्हाणपूर-धुळे बस थांबवली असता चालकाने चक्क विद्यार्थिनींच्या अंगावर बस घेऊन जाण्याचा संतापजनक प्रकार आज दुपारी तीन वाजता फैजपुर बस स्थानकात घडला. यावेळी विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून बस थांबवली.

फैजपुर चिनावल कुंभारखेडा रावेर ही एसटी नवीन वेळा पत्रकानुसार बंद करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी बसस्थानकात 3-4 तास थांबून असतात. आज विद्यार्थ्यांनी त्यांना होणारा त्रास सहन न झाल्याने त्यांनी एक निवेदन तयार करून विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या घेतल्या. तीन तास झाले तरी चिनावल बस येत नसल्याने विद्यार्थ्यांनी बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर बस क्र (एम एच 20 बीएल 3100) बऱ्हाणपूर-धुळे बस थांबवण्याचा प्रयत्न केला असता. या बसचालकाने चक्क विद्यार्थिनींच्या अंगावर बस नेण्याचा प्रयत्न सुदैवाने यात विद्यार्थिनी बाजूला झाल्याने मोठी जीवित हानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना या फैजपूर बसस्थानकात घडली असती. तरीदेखील विद्यार्थिनी न घाबरता बस समोर उभे राहून बस थांबवली. यावेळी चालकाने विद्यार्थिनीशी अरेरावीची भाषा केली.

दररोज येणारी फैजपूर-चिनावल-कुंभारखेडा-रावेर या मार्गे जाणारी बस दुपारी 12:30, 1:45 व 4 वाजेला या वेळेच्या बस सुद्धा वेळेवर येत नसतात त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत असतात विद्यार्थ्यांनी एसटी डेपो कर्मचारी यांच्याकडे निवेदन देऊन त्या निवेदनावर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content