फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । फैजपूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील काही भागातील रस्ते गटारीच्या कामांच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.
फैजपूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आले होते. यावेळी विषयपत्रिकेवर चर्चेसाठी १७ विषय होते. त्यात वैशिष्ट्य पूर्ण योजने अंतर्गत पालिकेच्या मालकीचे सि स नं ३७७६ मध्ये मुक्तीधामच्या बाजूस असलेली मोकळ्या जागेवर बगीचा विकसित करून त्यात कंपाउंड हॉल, खेळणी, वॉचमन रूम बांधणे,सन २०२०-२०२१या वर्षांसाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घनकचरा संकलन ,वाहतूक व प्रक्रिया करणे यासह काही भागांमध्ये गटारी ,चेंबर, रस्ता काँक्रीटीकरण,रस्ता खडीकरण करणे आदींना मंजुरी मिळाली आहे. यासोबत शहरातील जुना आमोदा रोड,भालोद रस्ता तसेच आसाराम नगर परिसरातील रस्ते डांबरीकरण करून खड्डे बुजणे यासह सतरा विषयांवर विचारविनिमय करून मंजुरी देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर प्रभारी नगराध्यक्ष रशीद तडवी व मुख्याधिकारी किशोर चव्हाण तर सभेला भाजपा गटनेता मिलिंद वाघूळदे,नगरसेवक हेमराज चौधरी, काँग्रेस गटनेता कलिम खां मण्यार, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता शेख कुर्बान यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. सभेचे कामकाज बांधकाम विभागाचे वरिष्ठ लिपिक दिलीप वाघमारे ,लिपिक सुधीर चौधरी यांनी पाहिले.