फैजपुर(प्रतिनिधी)। फैजपुर शहरात हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत आहेत यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. त्यामुळेच या शहराची झपाट्याने वाढ होत आहे, असे प्रतिपादन माजी आ.शिरीष चौधरी यानी हिंदू मुस्लिम पंचकमिटीतर्फे आयोजित ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.शिरीष चौधरी यांनी पुढे बोलताना सांगितलं की, फैजपुर शहर या ऐतिहासिक शहरात हिंदू मुस्लिम बांधव यांच्या एकात्मता ही संपूर्ण जिल्हाभरात ओळख आहे. तसेच पवित्र रमजान ईद या महिन्यात मुस्लिम बांधव यांनी रोजा यामुळे ईश्वराचे सेवा केली. या सेवेचा नक्कीच आपण सर्वानी राष्ट्रीय एकात्मता, चांगल्या पाऊस पडू दे अशी पार्थना यावेळी माजी आ.शिरीष चौधरी यांनी केली आहे.
या कार्यक्रमाला जि.प.गटनेते प्रभाकर सोनवणे, उपनगराध्यक्ष रशिद तडवी, भाजपा गटनेते मिलिंद वाघूळदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेख कुर्बान, भुसावळ येथील धीरज चौधरी, स.पो.नि.दत्तात्रय निकम, शिवसेना शहरअध्यक्ष नगरसेवक अमोल निंबाळे, यावल नगरसेवक असलम शेख नबी, सावदा येथील नगरसेवक फिरोज खान हबीबुला खान, मारुळ येथील जावेद जनाब, अकिल शेठ, यावल पं.स.माजी सभापती लीलाधर चौधरी, माजी.प.स.सदस्य विलास तायडे, नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे, डॉ इमरान, इरफान मेंबर, आबीद सर मलिक,रईस मोमीन, शहबाज खान शकील खान, चंद्रशेखर चौधरी, प्रा.डॉ.व्ही.आर.पाटील, भुसावळ नगरसेवक दुर्गेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले, अशोक भालेराव, राष्ट्रवादी जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे उपाध्यक्ष शेख शाकिर, कृ.उ.बा संचालक सय्यद अजगर, यावल काँगेसचे अध्यक्ष कदीर खान, यावल काँग्रेस युवक अध्यक्ष शेखअलीम ,भाजपा शहराध्यक्ष संजय रल ,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अन्वर खाटीक यांच्यासह शहरातील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक शेख जफर, नगरसेवक कलीम खा मण्यार, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, रियाज मेंबर, वसीम तडवी, वसिम जनाब, अन्सार शेख, आसिफ मेक्निकल, सईद मिस्त्री, सादिक शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजमिल काजी, आबीद यांनी केले तर आभार माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे यांनी केले.