जागेचा गटक्रमांक ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्याची ग्रामस्थांची मागणी

padase

फैजपूर प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मौजे पडळसे येथील गट क्रमांक २७४/२ ची जागा ग्रामपंचायतकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी आज गुरूवारी पाडळसे ग्रामस्थांनी फैजपूर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, यावल तालुक्यातील मौजे पाडळसे येथील गट क्रमांक २७४/२ चे क्षेत्रफळ १ हेक्टर २१ आर ही जागा चेअरमन मागासवर्गीय संस्था पाडळसे यांना जिल्हाधिकारी यांच्याकडील आदेश जा.न.जमावबंदी ३/२९४० दिनांक १८/५/७१ अनव्य संस्थेच्या हॉस्टेल बालक मंदिर खेळण्याच्या मैदानासाठी हक्काचे पत्रक नोंद क्रमांक ४१०६ दिनांक ३ ऑगस्ट १९७१ रोजी देण्यात आलेली आहे. त्यानुसार त्या ठिकाणी आर.एल. परदीप छात्रालयाचे बांधकाम करून छात्रालय व क्रीडागणासाठी त्याचा संस्थेने वापर सुरू केला होता परंतु मागील ३० ३५ वर्षांपासून सदरचे छायात्रालय बंद आहे व ज्या उद्देशाने संस्थेला जागा दिली होती. त्यासाठी वापर होत नसल्याने आदेशातील शर्ती / अटीचा भंग केल्यामुळे सदरची जागा संस्थे कडून काढून ग्रामपंचायत गावठाण कडे वर्ग करण्याबाबत ग्रामपंचायत ने ग्रामस्थांच्या मागणी नुसार दि १६/८/२०१८ च्या ग्रामसभा ठराव क्रमांक ४ अनव्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि २/११/२०१८ रोजी पत्रव्यवहार केलेला आहे त्यानुसार आपले स्तरावरून योग्य ते सहकार्य व्हावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर मौजे पाडळसे येथील ८७ महिला पुरुष ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदन देतांना पाडळसे येथील ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content