हरित पट्टा विकास घोटाळ्याबाबत फैजपूर नगरसेवकांचे आमरण उपोषण

faizapur 3

 

फैजपूर प्रतिनिधी । नगरपालिका हद्दीतील भुसावळ रोड, शिवकॉलनी व शिवाजी नगर येथे खुल्या परिसरातील जागा स्वच्छ करून तारेचे कंपाऊड व वृक्ष लावून हरित पट्टा विकसित करणे असा होते. मात्र संबंधित ठेकेदाराने जागा स्वच्छ न करता निकृष्ट दर्जाचे अतिशय बोगस असे, कामकाज केल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक अमोल निंबाळे यांनी केला असून पालिके समोर आज सकाळी 11 वाजता आमरण उपोषण सुरु केले.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नगरपालिका व ठेकेदार यांना वृक्ष लागवड कशी करावी, याबाबत अज्ञान आहे. वृक्ष लावताना ०.९ मीटर बाय ०.९ मीटर प्रमाणे खोदूण त्यात बगीचा युक्त माती व जैविक मिश्र खत यांचे मिश्रण टाकून सात ते आठ फुटाची लागवड करावी. परंतू संबंधित ठेकेदाराने छोटा खड्डा खोदून प्लास्टिक पिशवीतून रोपे काढून वृक्षरोपण केले. इतकेच नव्हे तर झालेले कामाचे रनीग मीटर तारेचे कंपाउंड व केलेले काम हे जास्त वृक्षरोपण दाखवून नगर पालिका प्रशासनाने ठेकेदारांची संगतमत करून २०० रुपयांचे झाड हे १,००३ रूपायला लावून ठेकेदाराचे बिल अदा करण्यात आले. याबाबत पालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना निर्देषांनात आणून दिले, तरी सुध्दा मुख्याधिकारी यांनी उडवा उडविची उत्तरे दिली असल्याचे निंबाळे यांचे म्हणणे आहे.

त्यामुळे पालिका निधी अक्षरशः बट्याबोळ झाली आहे. निधीचा दुरूउपयोग करण्यात आला असून संबंधीत हरित पट्टा वृक्षारोपणमध्ये मोठ्या प्रमाणावर निधीचा दुरूउपयोग केला असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे सुद्धा केली आहे. त्यामुळे या दोषी ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी, यासाठी शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक अमोल निबाळे, माजी नगरसेवक मनोज कापडे यांनी (दि.२३) डिसेंबर पासून आमरण उपोषण पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

फैजपूर पालिकेत कायम अभियंता नसल्याने कामाची तात्काळ चौकशी होऊ शकत नाही. अभियंता हे एकच दिवस पालिकेला मिळाले आहे. मी 6 जानेवारी पर्यंत उपोषणकर्ते यांना मुदत मागितली होती. परंतू त्यांनी ते अमान्य केली आहे. अजून सदरील संपली नसून कामे सुरू आहे. असे येथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले आहे.

Protected Content