आक्षेपार्ह फलक लावणार्‍यांवर कठोर कारवाई करा

faizpur city nivedan

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । आजी-माजी आमदारांबाबत मानहानी कारक फलक लावणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, आजी-माजी आमदारांचा अवमान करणारे फलक फैजपूर शहरासह संपूर्ण रावेर विधानसभा मतदार संघात लावले गेले असून याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. संबंधीत बॅनर हे फैजपूर येथे विविध ठिकाणी व इतर ठिकाणी लागलेले असून रावेर यावल मतदारसंघात हेतुपूर्वक राजकीय व सामाजिक बदनामी करण्याच्या सुडबुध्दीने सदर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या ठिकाणी अवैध बॅनर लावण्यात आले हे बॅनर लावणार यांचा आपण शोध घेऊन गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रती फैजपूरचे प्रांताधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या.

याप्रसंगी भाजपा प्रदेश सदस्य तथा माजी नगराध्यक्ष बी. के. चौधरी, जिल्हा दुध संचालक नगरसेवक हेमराज चौधरी, नपा भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, देवेंद्र साळी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस नरेंद्र नारखेडे, कांग्रेस जिल्हा चिटणीस केतन किरंगे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक शेख जफर, शेख जलील, मेहबूब पिंजारी, भाजपा तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज शेख साबीर, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, सरचिटणीस संजय सराफ, उपाध्यक्ष अनंता नेहते, समाजसेवक रवींद्र होले, जितेंद्र भारंबे, पप्पू चौधरी, राजेश महाजन, सुनील दुसाने ,सुनील जैन, जितेंद्र वर्मा, देवेंद्र झोपे, भाजपा महिला तालुका उपाध्यक्ष संगीता चौधरी, शहराध्यक्ष जयश्री चौधरी ,मोहिनी पाटील, दिपाली झोपे यासह भाजपा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content