रावेर (प्रतिनिधी) । उपविभागीय पोलिस अधिकारी अधिकारी राजेंद्र रायसिंग यांची बदली झाल्याने त्या रिक्त जागेवर उपविभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी सोमवार 25 फेब्रुवारी रोजी आपल्या पदाची सुत्रे घेतली.
नरेंद्र पिंगळे यांनी यापूर्वी नासिक, रावेर, धुळे येथे पोलिस निरीक्षक म्हणून आपली सेवा दिली होती. रावेर येथे असताना त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावली होती तर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवला होता. रावेर येथे असताना नरेंद्र पिंगळे यांचे डिवायएसपी म्हणून प्ररमोशन होऊन धुळे येथे बदली झाली होती तर आता धुळे येथून त्यांची बदली फैजपुर येथे झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी सोमवार रोजी पदाचे सूत्र हाती घेतले आहे.