यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत यावल येथील फैजान अब्दुल गफ्फार शाह यांची रावेर विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी ऑनलाइन मतदानाद्वारे निवड झाली.
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदाची निवड प्रक्रिया ही पुढील प्रमाणे राबविण्यात आली. २७ ऑक्टोबर २०२१ते २ नोव्हेंबर २०२१च्या दरम्यान नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, १२ नोव्हेंबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ – सभासद नोंदणी करणे, २० फरवरी २०२२ ते २८ फरवरी २०२२ – स्क्रुटणी ७ मार्च २०२२ व सायंकाळी ५ वाजता या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रीया व कार्यक्रम पुर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्यात आले.
या पद्धतीने पार पडलेल्या निवडणूकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यात पक्षाच्या वतीने सर्व पक्षाअंतर्गत विजयी युवक उमेदवारांना मिळालेले मतानुसार पदे वितरीत करण्यात आली यात यावल येथील फैजान अब्दुल गफ्फार शाह यांना २५६८ मत मिळून त्यांना युवक काँग्रेसच्या रावेर विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली ,
मारुळ येथील सय्यद मुदस्सर नझर यांना २५३५ मत मिळून- विधानसभा क्षेत्राच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर फैजपूर येथील व माजी विधानसभा अध्यक्ष वसीम जनाब यांना ७४७ मत मिळून- विधानसभा महासचिव फैजान शाह यांची निवड झाल्याबद्दल यावल येथील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. करण्यात आला व सर्व काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फैजान शाहचे स्वागत केले.
या वेळी माजी नगरसेवक गुलाम रसूल , नगरसेवक हारून शेख, नगरसेवक मनोहर सोनवणे, नगरसेवक समीर शेख. कॉंग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह,शहर अध्यक्ष कदीर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, अशफाक शाह, भुरा शाह आदी उपस्थित होते.