Home क्राईम फैजपुर येथील स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न फसला !

फैजपुर येथील स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न फसला !


फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील स्टेट बँकेत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना रात्री घडली असून यात सुदैवाने त्यांना यश आले नाही.

फैजपूर येथील स्टेट बँकेच्या शाखेत काल रात्री चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचे आज पहाटे उघडकीस आले आहे. चोरट्यांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न फसल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. तर याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे फिरवली आहेत.

दरम्यान, स्टेट बँकेपासून जवळच असलेल्या मसाला दुकानातून काही रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती देखील समोर आली आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. चोरीचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला असून यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

फैजपुर शहरात पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी आता परिसरातून करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound