फैजपूर प्रतिनिधी । शहरात आज दि. 31 ऑगस्ट रोजी जगन्नाथ रथ यात्रा काढण्यात आली. ही जगन्नाथ रथयात्रेचे द्वितीय वर्ष असून हरे कृष्ण मंदिराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
प्रथम रथयात्रेचे आयोजन प्रभुपाद यांनी इस्कॉनच्या वतीने करण्यात आले होते. चाळीस वर्षापासून पूर्ण विश्वामध्ये इस्कॉनच्या वतीने कुठे न कुठे रथयात्रा चालूच असते. या रथयात्रेचे मुख्य उद्देश अशा की, जे लोक आपल्या संसारिक कार्य कलाप सोडून जगन्नाथपुरी येथे जाऊ शकत नाही, रथ ओढू शकत नाही, त्यांच्यासाठी प्रत्येक शहरामध्ये जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करून त्यांना रथ ओढण्याची व दर्शन करण्याची तसेच मोफत कृष्ण प्रसादाचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी हरेकृष्ण भक्तांद्वारे जनसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात येते. जेणेकरून सर्व जीवांना भगवत कृपेचा लाभ होतो. त्याची सुरुवात ही सुभाष चौकातून मार्गस्थ होऊन खुशाल भाऊ रोड, रथ गल्ली व मिलिंद कापडे, भोईवाडा यांच्या सहयोगाने भक्तांसाठी सरबतचे वाटप करण्यात आले. मार्गक्रमण होऊन खंडोबा वाडी मंदिरात यात्रा संपन्न झाली.
पुनर्जन्म न विद्यते अनुवाद ब्रह्मांड पुराणामध्ये सांगितले आहे की, जो कोणी जीव रथावर आरूढ असलेले भगवान जगन्नाथाचे दर्शन करतो रथ ओढतो त्याला सरळ वैकुंठाची प्राप्ती होते. या रथ यात्रेमध्ये वृन्दावन येथून परमपूज्य भक्ती सुमन गोविंद स्वामी महाराज युरोप ब्रोनिया येथून नंद दुलाल प्रभू श्याममयी माता गोवर्धन मथुरा येथून परमपूज्य सचिनंदन प्रभू तसेच युवा हृदय सम्राट अनिल चौधरी भुसावळ व नगराध्यक्षा फैजपूर महानंदा ताई होले नगरसेवक व जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी व फैजपुर व जळगाव इस्कॉन अध्यक्ष श्रीमान चैतन्य जीवन प्रभू तसेच जळगाव, पिंप्राळा, मुक्ताईनगर, पाचोरा, भुसावळ, रावेर आणि यावल तसेच पंचक्रोशीतून व विशेषतः युरोपातून भक्तांच आगमन झाले होते. या कार्यामध्ये श्रीमान कन्हैया प्रभू, माधव दास, प्रभू अंकुश शेळके, हेमंत चौधरी, नरेंद्र परदेशी, तेजस परदेशी, जयेश राणा, जयेश सरोदे तसेच महिला वर्गाने श्रमदान घेतले.