जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवाजी नगरातील स्मशानभूमीत वाचमनसह सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आज बुधवार, दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देत मागणी केली आहे.
या निवेदनात, “जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील स्मशानभूमीच्या आवारात अनेक दिवसांपासून सुविधा उपलब्ध नाहीत. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नातेवाईकांना कोणत्याही सुविधा नसल्याने नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीत कायमस्वरूपी वाचमन नियुक्त करावी, त्यामुळे स्मशानभूमीतील वस्तूची चोरीला आळा बसणार आहे. शिवाय येथील लाईट, बोरींगसह साहित्यांची चोरी होणार नाही. त्यामुळे नागरीकांच्या सोयीपासून कोणतीही अडचण होणार नाही. तसेच स्मशानभूमी परिसरात झाडांना पाणी देण्यासह वृक्षांची संगोपन देखील केलं जाईल. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून वाचमनची नियुक्ती करण्यात यावी.” अशी मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी महापौर जयश्री महाजन यांना बुधवारी २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता निवेदन देवून केली आहे.