यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगाव परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयानिय अवस्था झाली असुन या मार्गावरील पडलेल्या खडयांमुळे रस्त्याच्या कामाबाबत गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाले आहे.
अतिशय मागील काही दिवसांपासुन तालुक्यातील दहिगाव परिसरातील रस्त्यांची ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असुन ”रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता” अशी दयनीय अवस्था झालेली आहे. या पादचारी व वाहनधारक आणि शेतकऱ्यांच्या वहीवाट असलेल्या मार्गाकडे मात्र आमदार तसेच जिल्हा परिषद सदस्य अधिकारी हे पुर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांमध्ये लोकप्रतिनिधींनी विरुद्ध कमालीचे संताप प्रकट होत आहे. दहीगाव पंचाळा कोरपावली नावरा विरावली या रस्त्याची दैनावस्था झालेली आहे. रस्त्यांवरून दुचाकी वाहन चालवणे सुद्धा अवघड झालेले आहे. रस्त्यावर चार गावांचा प्रवास मोठ्या प्रमाणावर होत असतो. रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेले असल्यामुळे या खड्ड्यांचे रुपांतर हे तलाव स्वरूप निर्माण झालेले आहे . या मार्गाने वाहनधारकांना वाहने चालवणे अतिशय अवघड झालेले आहे .नागरीकांच्या या समस्याकडे आमदारांचे मात्र दुर्लक्ष होत आहे . वेळी वेळी ग्रामस्थांनी आमदारांसमोर आपली ग्रहाणे मांडले असतादेखील तात्पुरते आश्वासने देऊन ग्रामस्थांचे मनधरणीचे काम लोकप्रतिनिधी करीत आहेत. असा आरोप गावातील नागरिक करत असून अधिकारी याकडे डोळेझाक करीत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.