पतंजलीच्या उत्पादन विक्रीत कमालीची घट; सप्लायरांना पेमेंट देण्यास उशीर, जाहिरात खर्चही केला कमी

Ramdev 860x508

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) साधारण मागील तीन वर्षापूर्वी योगगुरू आणि उद्योजक रामदेवबाबा यांची पतंजली कंपनी यशाच्या शिखरावर होती. परंतू आजच्या घडीला या कंपनीची आर्थिक स्थिती खराब झाली असल्याचे दिसून येतेय. कारण पतंजलीच्या व्यापारात मोठी घट आली असून सप्लायरांना पेमेंट देण्यास उशीर होतोय. तसेच पतंजलीने आपला जाहिरात खर्चही कमी केला आहे.

 

या संदर्भात ‘जनसत्ता’ने एक वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार सन २०१७ मध्ये बाबा रामदेव यांनी घोषणा केली होती की, त्यांच्या पतंजली कंपनीच्या टर्नओव्हरचे आकडे परदेशी कंपन्यांना कपालभाती करायला मजबूर लावतील. बाबा रामदेव यांनी सांगितले होते की, २०१८ पर्यंत पतंजलीची विक्री दुप्पट होत २०० अरब होईल. परंतू रामदेव बाबांच्या दाव्याच्या अगदी उलट पतंजलीच्या उत्पादनांच्या विक्रीमध्ये दहा टक्के घट होत अवघे ८१ अरब रुपये राहिली आहे. वार्षिक अर्थ अहवालातून याबाबत माहिती समोर आली आहे.

 

मागील आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्यात CARE रेटिंगने सांगितले होते की, अनुमानित ९ महिन्याचा डाटा अर्थात ३१ डिसेंबर पर्यंत पतंजलीचे विविध उत्पादनाच्या विक्री अवघी ४७ अरब रुपये असल्याचा संकेत देत आहे. कंपनीतील विद्यमान व माजी कर्मचारी,सप्लायर्स, वितरक स्टोअर मॅनेजर यांच्यासोबत केलेल्या चर्चेतून समोर आलेय की, पतंजलीने उचलेल्या काही चुकीच्या पावलांमुळे व्यापारात नुकसान झाले आहे. या लोकांनी खास करून उत्पादनांच्या गुणवत्तेकडे इशारा केला होता. परंतू तरी देखील कंपनीचा विस्तार झाला.

यावर पतंजलीचे म्हणणे आहे की, कंपनीचा झपाट्याने होणारा विस्तारामुळे सुरुवातीला एकही समस्या आल्यात. परंतू त्या समस्या सोडविण्यात आल्या होत्या. अनेक व्यावसायिकांप्रमाणे २०१६ मधील नोटबंदी आणि २०१७ मधील जीएसटीमुळे पतंजलीचे आर्थिक गणितं मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली. पतंजलीनुसार त्यांचे ३,५०० वितरक असून ते संपूर्ण भारतात ४७,००० किरकोळ विक्रेत्यांना माल पुरवितात.

 

पतंजलीच्या तीन सप्लायर्स सोबत झालेल्या चर्चेनुसार पैसे न मिळाल्यामुळे काही सप्लायर्स कंपनीपासून लांब तोंड फिरवताय. वृत्तसंस्था ‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार एक केमिकल सप्लायर सांगितले की, पतंजलीने २०१७ मध्ये पैसे देण्यास १ किंवा २ महिन्याचा उशीर करायला सुरुवात केली. २०१८ मध्ये तर पैसे देण्यास विलंब ६ महिन्यांपर्यंत वाढला होता.

 

मुंबईतील प्रमुख भारतीय रिटेलर्स आणि दुकानांच्या मॅनेजरांनी सांगितले की, पाहिजे तशी मागणी नसल्यामुळे पतंजलीचे अवघे काहीच उत्पादन स्टॉकमध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे पतंजलीने आपल्या जाहिरातीच्या खर्चात देखील कमालीची घट केली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउंसिल इंडियाच्या आकडेवारी नुसार २०१६ मध्ये पतंजली भारतातील तिसरी सर्वात मोठी जाहिराती देणारी कंपनी होती. तर अवघ्या तीन वर्षानंतर पतंजली पहिल्या १० मध्ये देखील आपले स्थान टिकवू शकली नाही. याबाबत पतंजलीची प्रमुख जाहिरात एजन्सी Vermmillion ने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Protected Content