धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात हातात लोखंडी कोयता घेवून मासेविक्री करणाऱ्या प्रौढाला तरूणाला खंडणीची मागणी करत मारहाण केल्याची घटना शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तोहित युसूफ खाटीक वय-५५ रा. पिंप्री खुर्द ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला तोहिर खाटीक हा मासे विक्री करत होता. त्यावेळी गावात राहणारा सुधाकर उर्फ गुड्डू रघूनाथ गायकवाड हा हातात लोखंडी कोयता घेवून तोहीर याच्याकडे आला व पैसे मागू लागला. त्यावेळी तोहितने सुधाकर गायकवाड याला पैसे देण्यास नकार दिला.
या रागातून सुधाकर गायकवाड याने हातात कोयता घेवून मारण्यासाठी उगारला. त्यावेळी बाजूला बसलेले अभिषेक चौधरी आणि तरबेज कुरेशी यांनी आवराआवर केली. दरम्यान या घटनेत अभिषेक चौधरी हा जखमी झाला आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार रात्री ११ वाजता सुधाकर उर्फ गुड्डू रघुनाथ गायकवाड रा. पिंप्री खुर्द याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजू पाटील हे करीत आ