नवी दिल्ली- केंद्रीय परिवहन मंत्रालयाने मोटार वाहन कायदा-1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 अंतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
मंत्रालयाने यापूर्वी 30 मार्च आणि 9 जून रोजी मोटार वाहन कायद्यांतर्गत फिटनेस, परमिट, परवाना, नोंदणी किंवा इतर संबंधित कागदपत्रांच्या वैधतेला 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिली होती.
देशभरातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाची स्थिती पाहता, 1 फेब्रुवारी 2020 रोजी वैधता संपलेली किंवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैधता संपणार असलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अशी कागदपत्रे 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध असल्याचे अंमलबजावणी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.