जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. मॅथेमॅटिकल सायन्स या चार वर्षीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून २९जून पर्यंत प्रवेशाची मुदत देण्यात आली आहे.
या प्रशाळेत सन २०१० पासून बी.एस्सी. (ॲक्च्युरियल सायन्स) हा अभ्यासक्रम सुरु केला होता. आता गतवर्षा पासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बी.एस्सी. मॅथेमॅटिकल सायन्स हा चार वर्षीय अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली असून २९ जूनपर्यंत प्रवेश प्रक्रिया सूरू राहणार आहे. या अभ्यासक्रमासाठी मुख्य विषय (मेजर) सांख्यिकी किंवा ॲक्चुरियल सायन्स हे विषय असुन उपविषय (मायनर) डाटा सायन्स किंवा अर्थशास्त्र निवडता येणार आहे. स्टॅटिस्टिक्स किंवा ॲक्च्युरियल सायन्स क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे. गतवर्षी या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी आठ विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात ॲक्च्युरियल सायन्सशी संबंधीत एसीईटी परीक्षा उत्तीर्ण केली. प्रवेशित विद्यार्थी संख्याशास्त्रा सोबत सॉफ्टवेअर्स मध्ये पारंगत होतात. १२ वी (कला, वाणिज्य व विज्ञान) मधील गणिताच्या गुणांच्या आधारे प्रवेश दिेले जातील. अशी माहिती संचालक प्रा. एस.आर. चौधरी व विभागप्रुख प्रा. आर.एल. शिंदे यांनी दिली.