Home Cities भडगाव भडगावात माजी विद्यार्थी मेळाव्यात महाविद्यालायाबद्दल कृतज्ञता व्यक्त

भडगावात माजी विद्यार्थी मेळाव्यात महाविद्यालायाबद्दल कृतज्ञता व्यक्त


 

0c821e82 8552 4201 8e71 ffe7550cc21f

 

 

भडगाव (प्रतिनिधी) येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघाच्या वतीने ‘माजी विद्यार्थी मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

 

यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचा ‘बाळासाहेब ठाकरे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत’ यश संपादन केल्याबद्दल, माजी विद्यार्थी अतुल पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल व माजी विद्यार्थी स्वप्निल भोसले यांचा मराठी विषयात राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, विद्यमान नगराध्यक्ष अतुल पाटील, नगरसेविका प्राजक्ता देशमुख, इम्रान सय्यद, प्रशांत कुंभारे, युवराज भोसले, उपप्राचार्य प्रा.एस.आर.पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक पी.डी.पाटील उपस्थित होते. माजी विद्यार्थी शशिकांत येवले, इम्रान सय्यद, गफूर मिर्झा, जुलाल सोनवणे, पूजा दाभाडे यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाशी असलेला ऋणानुबंध माजी विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून अधिकाधिक वृद्धींगत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. महाविद्यालयाच्या जडणघडणीसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी यथायोग्य योगदान देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे प्रभारी प्रा.डॉ.दीपक मराठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिनेश तांदळे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. ए.एन.भंगाळे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound