बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नाडगाव येथील रेल्वे उड्डाण पुलाची पाहणी आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या सहकार्यांसह केली.
मुक्ताईनगर ते बोदवड रस्त्यावर नाडगाव येथे मध्य रेल्वेची रेल्वे क्रॉसिंग असून येथे असलेले रेल्वे गेट तासन तास बंद राहते त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या पार्श्वभूमिवर, नाडगाव येथे रेल्वे उड्डाण पुल उभारण्यात आलेला आहे. दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मुक्ताईनरचे आमदार चंद्रकांत पाटिल यांनी आंदोलन करत रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करून दिला होता. या पार्श्वभूमिवर, आमदार एकनाथराव खडसे यांनी या कामाची पाहणी केली.
आ. एकनाथराव खडसे यांनी या उड्डाण पुलाची पाहणी केली असता पुलाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे केले असल्याचे आढळून आले पुलावर आणि पोहच रस्त्यावर केलेले डांबरीकरण एका पावसात वाहून गेले असून जागोजागी खड्डे पडले असुन त्याखालील माती उघडी पडली असुन चिखल झाला आहे पुलाचे इतर कामे सुद्धा अपूर्णावस्थेत आहेत यामुळे अपघात होउन मोठी हानी होण्याची संभावना असल्याचा आोप त्यांनी केला.
आ .एकनाथराव खडसे यांनी पुलाची पाहणी करून कामाच्या निकृष्ठ दर्जा बाबत सबंधित अधिकार्यांना जाब विचारून धारेवर धरले. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे,बाजार समिति उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, रामदास पाटील, किशोर गायकवाड, राजेंद्र माळी, भागवत टिकारे विजय चौधरी, प्रदीप बडगुजर, भरत पाटील, दिपक वाणी,किरण वंजारी, प्रमोद धामोडे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी नागरिक उपस्थीत होते.