जळगावात दुध व दुग्धजन्य पदार्थांचा मुदतबाह्य साठा नष्ट; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणी अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने जळगाव जिल्ह्यात विशेष मोहिम राबवत मुदतबाह्य दुध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट केला आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांनी सोमवारी १३ जानेवारी रोजी झालेल्या दूरदृष्य प्रणाली बैठकीत अन्न व्यवसायाच्या परवान्यांपासून ते “ईट राईट कॅम्पस” उपक्रमांपर्यंतची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले होते.

विशेष मोहिमेचे स्वरूप राज्यात भेसळ रोखण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावेत यासाठी सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जळगाव जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी विविध आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान, १४ नमुने विश्लेषणासाठी गोळा करण्यात आले. याशिवाय, विसनजी नगरातील रविराज एजन्सीमध्ये सुमारे 4095 रुपयांचा मुदतबाह्य दुध व दुग्धजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.

साठा नष्ट करण्याची कारवाई मुदतबाह्य साठ्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने हा साठा तत्काळ विक्रेत्याच्या समोरच नष्ट केला. तसेच, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची भूमीका ही मोहीम अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर, नाशिक विभागाचे सह आयुक्त म.ना. चौधरी, जळगाव जिल्ह्याचे सहायक आयुक्त (अन्न) सं. कृ. कांबळे, तसेच अन्न सुरक्षा अधिकारी कि.आ. साळुंके व श.म. पवार यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. सार्वजनिक आरोग्यासाठी महत्वाची पाऊल ही कारवाई नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली असून अन्न व औषध प्रशासनाने भविष्यातही अशा मोहिमा अधिक ठोसपणे राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

Protected Content