नाशिक – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सातपुडा विकास मंडळ, नाशिक येथे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाची कार्यकारणी प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे यांनी जाहीर केली. या वेळी बहिणाई ब्रिगेड जिल्हा अध्यक्षपदी संगीता महाजन यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
गुरुवार, दि.२१ एप्रिल २०२२ रोजी संपन्न झालेल्या या सभेप्रसंगी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, प्रा.कमलाकर पाटील, नाशिक जिल्हाध्यक्ष तुषार खाचणे, बहिणाबाई ब्रिगेडच्या नाशिक जिल्हाध्यक्षा संगिता महाजन, पल्लवी चोपडे, प्रतिभा चौधरी, नितिन सरोदे, रंजन बेंडाळे, राजू चौधरी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे व मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. भोळे यांनी युवकांना संघटना मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांना सामाजिक कार्यात जोडण्याचे आवाहन केले. समाजातील विविध प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विविध समजोपयोगी उपक्रम राबविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
जाहीर करण्यात आलेली जिल्हा कार्यकारिणी –
जिल्हा अध्यक्ष- तुषार खाचणे
उपजिल्हाअध्यक्ष: हितेंद्र फालक व सचिन बोंडे
जिल्हासचिव: ऋषिकेश भोळे
सहसचिव: मिरज नारखेडे
खजिनदार: दिपक सरोदे
संपर्कप्रमुख: विवेक गाजरे
विभागीय अध्यक्ष : निलेश वायकोळे (सातपूर), मयुर चौधरी (जेलरोड)
सल्लागार: दिपक इंगळे व प्रविण बोंडे
जिल्हा सदस्य: वैभव फालक, दिपक अत्तरदे, अमोल कोलते, भागवत नारखेडे, सनी धांडे, लोमेश ढाके, हर्षल नारखेडे, हरीष सरोदे, प्रसन्न करांडे
शहराध्यक्ष: प्रतिक वारके
उपशहराध्यक्ष: अमोल गारसे
शहरसचिव: कुणाल भारंबे