चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | आपल्या कार्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांना नगरपालिकेच्या वतीने सन्मानपत्र देऊन नुकतीच गौरविण्यात आले.
चाळीसगाव येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता संदीप शेंडगे यांनी शहरासह तालुक्यात महावितरणच्या माध्यमातून दिलेले योगदान गौरवास्पद आहे. कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर अभियंता तसेच विभाग प्रमुख म्हणून कामाच्या माध्यमातून त्यांनी हि ओळख प्रस्थापित केली आहे.
तत्पूर्वी अभियंता शेंडगे हे नेहमीच वीज वितरण विभागाच्या माध्यमातून पर्यावरणाची जनजागृती केली आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या प्रत्येक मोहिमेत त्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदणीत असतात. याच पार्श्वभूमीवर चाळीसगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या हस्ते शेंडगे हे सन्मानित झाले आहे. याबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.