खळबळजनक : माथेफिरू युवकाने जाळली शेंदुर्णी पोलीस चौकी (व्हीडीओ)

1a855659 cdc3 4fb5 86c5 ed5d460f8369

जामनेर (वार्ताहर) तालुक्यातील पहूर पोलीस स्थानक अंतर्गत येणारे शेंदुर्णी पोलीस चौकी आज सकाळी (शनिवार) एका माथेफिरूने पेट्रोल टाकून पेटवून दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्या माथेफिरूने पोलीस चौकी का जाळली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

 

या संदर्भात अधिक असे की, आज सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी समाधान बळीराम पाटील (रा. शेंदुर्णी) हा आज सकाळी अचानक पेट्रोलचा  कॅन घेऊन पोलीस चौकीत अचानक घुसला. त्यानंतर त्याने संपूर्ण पोलीस चौकीत पेट्रोल टाकायला सुरुवात केली आणि त्यानंतर आगपेटीने पेटवून दिले. दरम्यान, या आगीत पोलीस चौकीतील अनेक महत्वाची कागदपत्र, फाईल्स आणि साहित्य साहित्य जळून खाक झाले आहे. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये एकच कर्मचारी हजर होता. त्या कर्मचाऱ्याने माथेफीरू यूवकास रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो असफल ठरल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, या अग्नीकांडमुळे जिल्हा पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्या माथेफिरूने पोलीस चौकी का जाळली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. याप्रकरणी संशयित आरोपी समाधान पाटील याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

 

Protected Content