सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । शिक्षिकांना कोरोनाबाबत सुरू असणार्या माझे कुटुंब-माझी जबाबदारी या मोहिमेच्या सर्वेक्षणाच्या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी आज निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सावदा नगरपालिका कार्यक्षेत्र असलेल्या परिसरात सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी शहरातील शिक्षक आणि शिक्षिका यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. या कामकाजातुन महिला शिक्षकांना वगळावे अशी मागणीचे निवेदन पालिका मुख्यधिकारी सौरभ जोशी यांना दि २३ रोजी १२ वाजता शिक्षिकांनी दिले
या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या मार्फत सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी शहरातील शिक्षक आणि शिक्षिका यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे या कामी आम्हा तीनच महिलांची नियुक्ती केली असून यापूर्वी देखील मे महिन्यापासून कोविड-१९ प्रादुर्भाव उपाययोजना म्हणून वेळोवेळी दिलेले काम आम्ही केले आहे. परंतु आता ऑनलाईन आणि ऑफलाईन अध्यापन सुरू असल्याने याकामातून आम्हाला वगळण्यात यावे अशी मागणी मुख्याधिकारी यांच्या कडे
येथील नगरपालिका संचलित श्री ना वि ह पाटील विद्यामंदिर आणि श्री आ.गं. हायस्कूल येथील शिक्षिका चारुलता सतिष चौधरी, भारती सतिश महाजन आणि प्रणाली नितीन काटे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी देखील दि. २८/८/२०२० रोजी सर्व प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांना पत्र देऊन सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोविड-१९ कामातून कार्यमुक्त करावे अशी सूचना केली आहे. सध्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षण देण्यात येत आहे त्यामुळे शिक्षकांना दुहेरी कामकाज करावी लागत आहे तसेच स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आम्हाला या कामातून वगळण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.