Home क्राईम खळबळजनक : जिल्हा कारागृहातील कैद्याकडे मोबाईल आढळला

खळबळजनक : जिल्हा कारागृहातील कैद्याकडे मोबाईल आढळला


जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्हा कारागृहात एका कैद्याकडे मोबाईल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जिल्हा कारागृहाच्या पाठी मागील भींतीवरून एका अज्ञात व्यक्तीने बुधवार २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ५.४५ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या कोवीड बँरेक व १२ नंबर बँरेक मधील मोकळ्या भागात मोबाईल फेकला. फेकलेला मोबाईल न्यायालयीन कैद असलेला प्रशांत अशोक वाघ याने उचलला.  दरम्यान कैदी प्रशांत वाघ यांच्याकडे मोबाईल आढळून आल्याने जेल पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल हस्तगत केला आहे. कैदी प्रशांत वाघ याने १८ नोव्हेंबर रोजी एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटून नेणाऱ्या चार दरोडेखोरांपैकी एक दरोडेखोर आहे. जेल शिपाई बुढन भिकन तडवी (वय-३७) रा. जळगाव जिल्हा कारागृह यांच्या फिर्यादीवरून कैदी प्रशांत अशोक वाघ यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरोधात न्यायालयाच्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत कुमावत करीत आहे.


Protected Content

Play sound