एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील श्री. क्षेत्र सुकेश्वर देवस्थान येथे आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशी महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला आहे.
श्रीगुरु नामदेव महाराज भामरे यांनी संस्थापित केलेल्या श्री सुकेश्वर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे हे 47 वे वर्ष होते परंतु कोरोना मुळे दोन वर्षांपासून दिंडी सोहळा होऊ शकला नाही.त्यामुळे यंदाही सुकेश्वर येथील विठ्ठल मंदिरातच आषाढी एकादशी महोत्सव कोरोना नियमावलीचे पालन करून मोजक्याच भाविक भक्तांच्या उपस्थितीत नुकताच उत्साहात संपन्न झाला.त्यानिमित्त ह.भ.प रुपचंद सोनवणे गुरुजी व रमेश दुसाने यांच्या परिवाराचे हस्ते विठ्ठल रुक्मिणी महापूजा झाली. यानिमित्त ह.भ.प विजय महाराज कोळी यांचे प्रवचन तर ह.भ.प भागवत महाराज शिरसोली यांचे संकीर्तन संपन्न झाले. याप्रसंगी सुकेश्वर येथील सर्व मंदिरातील देवदेवतांच्या पूजाविधी करून माल्यार्पण करण्यात आले तसेच ह.भ.प विजय महाराज कोळी यांनी नुकतीच श्री नर्मदा परिक्रमा यात्रा केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी ह.भ.प चंद्रकांत महाराज, ह.भ.प साहेबराव महाराज, ह.भ.प नारायण महाराज, ह.भ.प मधुकर महाराज व विष्णू कोळी चोपदार, ज्ञानेश्वर चौधरी यांनी परिश्रम घेतलेत.तर ह.भ.प समाधान महाराज, ह.भ.प शिवाजी महाराज, ह.भ.प जितेश महाराज, ह.भ.प निवृत्ती महाराज तसेच भजनी मंडळी रवणजे व सुकेश्वर विश्वस्त मंडळी हे उपस्थित होते. सर्व भाविकांचे ह.भ.प विजय नामदेव भामरे अध्यक्ष, सुकेश्वर देवस्थान यांनी आभार मानले.