पाचोरा, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग पाचोरा व शिंदे इंटरनॅशनल स्कूलतर्फे काल (दि.३) तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा २०१९ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात तालुक्यातील शाळांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचे उद्घाटन गिरणाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे व शिंदे इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य डॉ. विजय पाटील व तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील व क्रीडा शिक्षक सुनील मोरे राजपूत, निलेश कुलकर्णी, जावेद शेख सर, सुशांत जाधव, शोएब अली, निवृत्ती तांदळे, सोनाली नारकोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
१४ वर्षांखालील मुले व मुली :- बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा विजयी व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा उपविजयी तसेच मुलींमध्ये बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूल विजयी.
१७ वर्षांखालील मुले व मुली :- न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा विजयी व बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूल उपविजयी व मुलींमध्ये बुर्हानी इंग्लिश मीडियम स्कूल विजयी व शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरा उपविजयी ठरले. तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत शिंदे इंटरनॅशनल स्कूल पाचोरातर्फे मुलांना सुवर्णपदके देऊन जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्कूलचे क्रीडाशिक्षक व क्रीडा मार्गदर्शक सुनील मोरे, जावेद शेख, शोयब अली यांनी परिश्रम घेतले.