निपाणे येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात

Nipane

 

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील निपाणे येथील संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालयात गटसाधन केंद्र शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने (दि.९ व १० डिसेंबर) दोन दिवसीय तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात पार पडले आहे.

पहिल्या दिवशी उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उज्वला पाटील या होत्या तर उद्घाटक म्हणून एरंडोल पारोळा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे शिक्षण सभापती तात्यासाहेब भोळे, जिल्हा परिषदेचे सदस्य नाना महाजन, पंचायत समितीचे उपसभापती अनिल महाजन, पंचायत समितीचे सदस्य विवेक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव शिवाजीराव पाटील, परिसरातील सर्व सरपंच आजी-माजी पदाधिकारी गटशिक्षणाधिकारी विश्वास हरी पाटील, पंचायत समितीचे शिक्षण विस्ताराधिकारी जे.डी.पाटील, संस्थेचे मुख्याध्यापक संदीप महाजन व सर्व शिक्षक वृंद केंद्रप्रमुख संघटनेचे रवींद्र लांळगे व सर्व केंद्रप्रमुख सर्व केंद्रप्रमुख शिक्षण विभागाचा सर्व स्टॉप गटसाधन केंद्राचे सर्व विषय तज्ञ व सर्व स्टाफ सर्व शाळांचे मुख्याध्यापक आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

पहिल्या दिवशी यांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी प्रास्ताविक तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी केले व विज्ञान प्रदर्शन आयोजनामागील हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे उद्घाटक एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आ.चिमणराव पाटील यांनी नवीन पिढीने विज्ञानाची कास धरावी, जीवनात सर्वांनी अभ्यासू वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले व विज्ञानामुळे नवीन प्रयोगाची संधी असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपटतात्या भोळे यांनी माझ्या कार्यकाळात सर्व तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भेट देऊन मागील काही वर्षांपासून मी जिल्हाभरात बारकाईने पाहणी केली असता जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण भागातील विद्यार्थी नवनवीन प्रयोग करतात हे पाहून समाधान वाटत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतानाच विज्ञानाचे महत्त्व सर्वांनी स्वीकारावे, असे सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सहभाग
प्राथमिक शिक्षक गटात 42 माध्यमिक गटात तीस उच्च प्राथमिक गटात 39 माध्यमिक शिक्षक 11 परिषद 5 असे व 145 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्राध्यापक मिलिंद पाटील, हेमंत पाटील, व पी.के.पाटील यांनी परीक्षण केले.

दुसरा दिवसाचे कार्यक्रम
शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, ग्रामीण भागातील विज्ञान प्रदर्शन मॉडेल विद्यार्थ्यांना संशोधनाची चालना मिळायला पोषक वातावरण तयार होत असून आता संशोधनाची नवनवीन दालन खुले असून भारत देशाला वैभवशाली परंपरा लाभलेली आहे, म्हणून विद्यार्थ्यांनी सर्व थोर शास्त्रज्ञ यांचे जीवन अभ्यासून आपल्या व्यक्तिगत जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा व अंधश्रद्धेला आणि अनिष्ट रूढीपरंपरेला आदराजंली द्यावी. जीवनात यश अपयश महत्त्वाचे नसून सहभाग व प्रयत्न महत्वाचे आहे. म्हणून बक्षीस मिळाले नाही, किंवा नंबर आला नाही, त्यांनी नाउमेद होता कामा नये. अनुभवाने देखील माणसाचे जीवन समृद्ध होते.

यांच्याहस्ते बक्षीस वितरण
गटविकास अधिकारी मंजुष्री गायकवाड यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज स्पष्ट केली तर गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी सहभागी सर्वांचे कौतुक केलं. विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी मंजुष्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील, शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक राज्य शासन आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर आदि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यांनी मिळवले बक्षीस
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांमध्ये माध्यमिक गटात प्रथम क्रमांक योगेश कुंभार, साधना माध्यमिक विद्यालय कासोदा प्लास्टिक टू पेट्रोल, द्वितीय क्रमांक सुशील जाधव, संत हरिअर माध्यमिक विद्यालय निपाने पॉली हाउस, तृतीय क्रमांक सुयश चव्हाण, उत्तेजनार्थ सानिका काळे, हर्षाली पाटील.

विद्यार्थ्यांच्या प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक जि.प. उर्दू मुलींची शाळा कासोदा सानिया आणि मिसबा यांच्या रोड ट्रान्सपोर्ट उपकरण यांनी पटकावला. दुसरा क्रमांक रा.ती.काबरे विद्यालय एरंडोलचे रोबोट उपकरणाचे ओम भवर आयुष सांळी यांनी पटकावला तर तृतीय क्रमांक होम मेड ॲनिमेशन उपकरणाचे चेतन पाटील, रोहित पाटील, सम्यक इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल यांना मिळाला. उत्तेजनार्थ जि.प.शाळा पिंपळकोठा बुद्रुकचे मोनालीसा बडगुजर, योगेश बडगुजर, जे.एस.जाजू माध्यमिक विद्यालय उतरानचे मयुर चौधरी यांना बक्षीस मिळाले. शिक्षक संवर्गाच्या माध्यमिक शिक्षक गटातून प्रथम क्रमांक संता हरिहर माध्यमिक विद्यालय निपानेचे प्रवीण मराठे गणितीय प्रतिकृती, उत्तेजनार्थ मोरे तळ ई माध्यमिक विद्यालय, प्राथमिक शिक्षक गटातून प्रथम क्रमांक प्रवीण भदाणे, जि.प.शाळा ब्राह्मने तर उत्तेजनार्थ यादीतील क्रमांक संध्या सुभाष चंद्र लोखंडे जि.प.शाळा पिंपळकोठे यांना मिळाला.

यांची होती उपस्थिती
दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण व समारोपीय व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुष्री गायकवाड, व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील, शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर, शरद ठाकूर, भाईदास पाटील, संदीप महाजन, पी.एस.पाटील, संत हरिहर माध्यमिक विद्यालयाचा सर्व स्टॉप आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

सर्वस्तरावरुन शुभेच्छा
तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सुंदर नियोजन केल्याने संत हरिहर माध्यमिक विद्यालयाचे व निपाने गावाचे आणि पंचायत समितीचे नाव सर्वांच्या ओठावर होते. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील उपशिक्षणाधिकारी डॉ.डी.एम.देवांग, डायटच्या प्राचार्य डॉ.मंजुषा क्षीरसागर, पंचायत समितीच्या सभापती रजनी सोनवणे, शकुंतला महाजन व सर्व सदस्य आदींनी सर्व विद्यार्थ्यांसह संयोजकांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

Protected Content