जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सिंधी कॉलनी रोडवरील विनोद गॅरेजच्या भिंतीजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता समोर आली आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे.
सिंधी कॉलनी परिसरात विनोद गॅरेजच्या दुकानाच्या बाजूला असलेल्या भिंतीजवळ शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता एका अनोळखी ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती जिल्हापेठ पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. यावेळी तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. याबाबत दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख नातेवाईकांनी पटवावी असे आवाहन जिल्हापेठ पोलिसांनी केले आहे. या घटनेचा पुढील तपास पाहेकॉ शरीफ शेख हे करीत आहे.