Home धर्म-समाज पुढे ढकलण्यात आल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा

पुढे ढकलण्यात आल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा

0
30

मुंबई वृत्तसंस्था | राज्यातील कोरोना आणि ओमायक्रोन विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोमवार, दि.१७ जानेवारी २०२२ पासून सुरु होणार होत्या मात्र आता या परीक्षा सोमवार, १४ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.

सोमवार, दि. ३१ जानेवारी २०२२ पासून सुरु होणाऱ्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा आता पुढे ढकलत दिनांक सोमवार, दि.२८ फेब्रुवारी २०२२ पासून घेण्यात येणार आहेत.


Protected Content

Play sound