जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात तसेच राज्यात कोरोना संसर्ग प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन न घेता, नियमित ऑफलाईनद्वारा घेण्याचा निर्णय झाल्यानुसार जिल्ह्यात २८२ केन्द्रावर शुक्रवार, दि.४ मार्च पासून १२ वी बोर्डाच्या परीक्षा सुरु होत आहेत.
जिल्ह्यात तसेच राज्यात संसंर्ग प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून शैक्षणिक सत्रातील पदवी, पदव्युत्तर परीक्षा ऑनलाईन तसेच दहावी, बारावीच्या बोर्डाच्या मागील वर्षाच्या गुणांसह सरासरी गुण देऊन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात आले होते. परंतू या वर्षी मात्र संसर्ग प्रादुर्भाव कमी झाल्याने महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासह दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाईन न घेता, नियमित ऑफलाईनद्वारा परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यानुसार जिल्ह्यात २८२ केन्द्रावर ४ मार्च पासून १२ वी बोर्डाच्या परीक्षा सुरु होत आहेत. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ४८००० विद्यार्थी प्रविष्ट होणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी दिली.
जिल्ह्यात बारावी बोर्डाच्या परीक्षा ४ मार्च पासून सुरु होत असून संसर्ग प्रादुर्भाव उपाय योजना अंमलबजावणीसह प्रत्येक तालुकानिहाय तहसील स्तरावर परीक्षा केंद्रावर भरारी पथक तैनात आहे. तसेच विद्यार्थ्यांची थर्मल गनद्वारे तापमान तपासणीसाठी आरीग्य पथक जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या यांच्या सुचनेनुसार तैनात करण्यात आले आहे. बारावीसाठी २८२ केंद्रावर ४८००० विद्यार्थी तर दहावीसाठी ७६१ केंद्रावर ५८००० परीक्षार्थी परीक्षा देणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बच्छाव यांनी म्हटले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/494227162198290