जळगाव प्रतिनिधी । शासकीय तंत्र निकेतनच्या सन १९८८ ते २०१९ च्या बॅ्चच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच जळगावातील बालाणी रिसोर्ट येथे पार पडला.
यावेळी आलेल्या विद्याथ्र्यांचे जगदीश पाटील, प्रशांत महाजन, अनिल शिरसाठ, दीपक वर्हाडे, विनोद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रविंद्र महाले, संजय सपकाळे यांनी ढोलताश्यात स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक जगदीश पाटील व अनिल शिरसाठ यांनी केले.
यांचा झाला सत्कार
महावितरण मध्ये उपकार्यकारी अभियंता पदावर असलेले राम पाटील हे संघटनेचे सचिव झाल्यावद्द्ल तर महावितरण मध्ये सहाय्यक अभियंता पदावर असलेले संजय पवार हे फोरम मध्ये निवडून आल्या बद्द्ल, एचएएल कंपनीत कार्यरत रंजना चौधरी यांच्या मृग जलके बंदी या नाटकाला प्रथम पुरस्कार तसेच उत्कृष्ट अभियनाचा पुरस्कार मिळाल्या बद्द्ल सत्कार करण्यात आला. पदमाकर पाटील हे जलसंधारण विभागात कार्यकारी अभियंता झाले म्हणून तर अनील शिरसाठ हे फाऊंडेशन ब्रेक या कंपनीत सतत तीन वर्ष विशेष कामगीरी केल्या मुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.
परदेशातून उपस्थीती
या स्नेहमेळाव्याला रियाध वरुन देवेंद्र भंगाळे, इंग्लडहून अमर पाटील, तर सौदी अरेबीया येथे कंपनी मॅनेजर असलेले नंदू रायगडे उपस्थीत होते. आमदार संजय सावकारे काही कारणास्तव उपस्थीत राहू शकले नाही पण त्यांनी शुभेच्छा पाठवल्या होत्या.
कार्यक्रमात धमाल
दुपारच्या सत्रात उपप्राचार्य ज्योती लोहार ही काही विनोदी गेम्स घेतले. त्यात सहसंचालक सतिश सुर्यवंशी, वैशाली खुराणा, जितेंद्र वानखेडे, सुनिता तायडे आदींनी भाग घेवून धमाल उडवली. सोबत जगदीश पाटील, ज्योती लोहार, माधुरी महाजन , संदीप महाजन, वसुंधरा भामरे यांनी कविता वाचन केले, शेरोशायरी आदी प्रकारांचा सर्वांनी मनमुराद आनंद घेतला.
बहारदार नृत्य
संध्याकाळच्या सत्रात ज्योती लोहार ,संदीप सोनवणे विजय संधानशीव, महेश कापडी, श्रीकांत लोह्करे, संदीप महाजन, वसुंधरा भामरे, अमर पाटील, एकनाथ ठाकूर, सुभाष चव्हाण, वैशाली खुराणा आदींनी सदाबहार गाणी सादर केलीत. विजय तायडे व प्रदीप धोंगळेंनी बहारदार नृत्यांची उपस्थीतांची मने जिंकली.
नारखेडे यांच्यातर्फे भेट
अमेरीकास्थित नितीन नारखेडे हयांनी उपस्थीत असणार्या प्रत्येकाला गणेश प्रतिमा भेट पाठवल्या होत्या. नंदू रायगडे, अनिल तडवी, विजय तायडे , संदीप महाजन, विजय तायडे सतिश सुर्यवंशी सह संचालक आदींनी समोयोजीत भाषणे केलीत सुत्रसंचालन संजय सपकाळे यांनी केले.
संदीप सोनवणे व विजय संदानशीव यांच्या सलामत रहे दोस्तना हमारा या गीताने समारोप झाला.