चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील राजगड स्थित निवासस्थानी चाळीसगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा पद्मजा देशमुख यांच्या वतीने आयोजित हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी शहरासह तालुक्यातील सर्वस्तरातील मान्यवर महीला भगीनींनी हजारोच्या संख्येने समारंभासाठी उपस्थिती लावल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
आजच्या आधुनिक यंत्रयुगात संस्कृती,धर्म,रुढी व परंपरा कालबाह्य गोष्टी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत.आज आपण सण साजरे करतांना त्यामागील धार्मिक हेतू जाणून करतो.म्हणून संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला महिलांना एकत्रित बोलावून हळदीकुंकूमागचा हेतू व उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून वैचारिक,बौद्धिक देवाणघेवाण झाल्याचे यावेळी दिसून आले व उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता,कविवृत्ती जागृत झाल्याने हा आनंद द्विगुणीत झाला तसेच पूर्वजांनी प्रत्येक सणामागे काहीतरी उद्देश ठेवला यातून भेटीगाठी होतात,प्रेमाची व विचारांची देवाणघेवाण,चालीरीतींना उजाळा मिळाल्याचे पद्मजा देशमुख यांनी सांगितले.
सायंकाळी ५ वाजेनंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.सौ.प्राजक्ता देशमुख,माजी नगराध्यक्षा पद्नजा देशमुख,तळेगांव ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सोनाली देशमुख,प्रणोती देशमुख,डॉ.अरुंधती देशमुख आदींनी तीळगुळ आणि संक्रांतीचे वाण देऊन महीलांचे स्वागत केले.अतिशय शिस्तबध्दपणे पार पडलेल्या समारंभात तीळगुळ घ्या गोड गोड बोला असे एकमेकांना म्हणत हातातील तीळाची वडी एकमेकींच्या हातावर ठेवत महीलांनी मोठ्या उत्साहात हळदीकुंकू सण साजरा केला यावेळी सुबक रांगोळीसह विद्युत रोषणाई व रंगीबेरंगी पतंग यांनी परिसर सजलेला दिसून आला.यावेळी महिलांनी हास्यविनोद करीत संवाद साधत ही अनोखी संध्याकाळ अनुभवली.