माजी खासदार मोहन रावले यांचे देहावसान

मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे तब्बल पाच वेळेस प्रतिनिधीत्व केलेले माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झाले आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

माजी खासदार मोहन रावले यांचे आज निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. काही कामानिमित्त गोवा येथे गेले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. रावले हे १९९१ मध्ये ते मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ असे मिळून सलग पाच वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. दरम्यान, २००९ मध्ये पुनर्रचित मतदारसंघात त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

दरम्यान, रावले यांच्या निधनानंतर खासदार संजय राऊत यांनी आपण एक सच्चा मित्र गमावला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Protected Content