चोपडा प्रतिनिधी । माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यातील हंड्याकुंड्या सिंचन प्रकल्पाला भेट देऊन याच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी अधिकार्यांना सूचना केल्या.
सन १९९८ पासुन प्रशासकीय मान्यता मिळालेल्या हंड्याकुंड्या हा सिंचन प्रकल्प गेल्या २२ वर्षा पासुन वनी करणासाठी पर्यायी जमीन न मिळाल्याने प्रलंबित होता. पर्यायी वन जमिन मिळण्यासाठी आमदार सौ. लताताई सोनवणे व माजी आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. त्यांनी या प्रकल्पासाठी अवश्यक असणारी पर्यायी वन जमीन मिळवुन दिली.
या अनुषंगाने संबंधीत प्रकल्पाच्या कामाला तात्काळ चालना मिळावी म्हणुन वन विभागाचे साहय्यक वन संरक्षक व्ही.ए.पवार, वनक्षेत्रपाल समाधान सोनवणे तसेच वन्यजीवचे वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार, लघु पाटबंधारे उप अभियंता एन.टी.आढे व प्रकल्प सल्लागार उज्वल पाटील यांच्या सह हंड्याकुंड्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. या कामाचे सुधारीत अंदाज पत्रक तयार करून शासनाकडे प्रथम सुप्रमा मिळण्यासाठी संबधित अधिकारी यांना सुचना केली. या प्रकल्पाचे काम पुर्ण झाल्यावर दोन दशलक्ष घनमिटर इतका पाणी साठा होणार आहे. या मुळे २६० हेक्टर इतकी जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी बांधवाना याच्या फायदा होणार असल्याने आदिवासी बांधवानी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी सुकलाल कोळी, तालुका संघटक सुनिल पाटील, प्रताप पावरा, प्रल्हाद पाडवी, आत्माराम पावरा, विकास बारेला, चिमा पावरा, पंडीत कोळी , गणेश न्हावी, गिलदार बारेला, हनुमान राठोड, प्रविण पावरा यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थीत होते.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news