सुनेच्या प्रचारात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे सक्रीय !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार खा. रक्षाताई खडसे यांचे प्रचारास सुरुवात केली आहे. मंगळवारी आ. एकनाथराव खडसे यांनी यावल येथील भाजपा प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यां कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला.

भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी जाहीर केल्यानंतर अद्यापपर्यंत सक्रिय झाले नव्हते. मात्र दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झाल्याची त्यांनी यावल येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, “वरिष्ठांकडे माझ्या भाजप प्रवेशाबाबत मी सूचित केले होते. त्यानुसार भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे तसेच भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे. बैठका घेण्यास व प्रवास करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार मी गेल्या दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झालो असून यावल हे माझे प्रचारार्थ आठवे गाव असल्याचे त्यांनी सांगितले.

आगामी निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणूक मतदार संघ अंतर्गत भाजपा उमेदवारास किती लीड मिळेल. यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मतदारांचे मतदानाचे प्रमाण यावर लीड अवलंबून असेल तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रक्षाताई खडसे प्रचंड बहुमताने निवडून येतील असं त्यांनी सांगितले. दरम्यान खडसे हे यावल तालुक्यात प्रचाराच्या निमित्ताने आले असतांना तालुक्यातील एका भाजपाच्या पुर्वाश्रमी व दुसऱ्या पक्षात गेलेल्या एका पक्षाच्या पदधिकारी यांच्याशी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांची मोबाईलवरून झालेली शाब्दीक चकमकीची राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

Protected Content